राष्ट्रीय महामार्गावर अपघात: सोळा चाकी ट्रक थेट नाल्यात

बीड : रायगड माझा वृत्त

कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे मालवाहू ट्रक नाल्यावरून पंधरा फुटावरून खाली पडला. यात चालक गंभीर जखमी असून त्याची स्थिती चिंताजनक आहे.

कोळगाव येथील स्थानिक लोकांच्या मदतीने व जेसीबीच्या सहाय्याने केबीनमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला गंभीर जखमी अवस्थेत तीन तासाच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत