राहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

राफेल सौद्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली असून दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जबरदस्त शाब्दीक युद्ध सुरू आहे. राहुल गांधी हे जवळपास दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करत असून त्यांनी राजस्थानमधील एका जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना त्यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याबद्दलही विधान केले. या विधानाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. राफेलची चर्चा टाळण्यासाठी मोदी एका महिलेच्या मागे लपत आहेत असे विधान राहुल यांनी केले होते. या विधानामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण दुबळ्या असल्याचं वाटत असल्याचं महिला आयोगाने नोटीशीत म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी राफेल मुद्दयापासून पंतप्रधान दूर पळत असून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी संसदेत एका महिलेला पुढे केले आहे. असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरचं महिला आयोगाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी यावर ट्वीट केले असून त्यात राहुल गांधी म्हणतात की एका महिलेला सांगितलं की माझी रक्षा करा? त्यांना असं वाटतं का की महिला दुबळ्या आहेत. त्यांच हे विधान संरक्षण मंत्री दुबळ्या असल्याचेच दर्शवत आहे. असे शर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल यांनी सीतारमण यांच्यावर हे विधान केल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शहा, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मोदी यांनी राहुल यांचे हे विधान महिलाविरोधी असल्याचा आरोप केला होता. त्यावर मूळ मुद्दा सोडून विषय बदलणे सोडून द्या. माझ्या प्रश्नाचं उतर द्या. राफेल करारात बदल करताना संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेतली होती की नाही ते आधी सांगा. असे राहुल यांनी म्हटले होते. सीतारमण यांच्यावर राहुल यांनी केलेल्या विधानावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांचे विधान खालच्या पातळीवरचे असल्याचे स्वराज यांनी टि्वट केले होते.

राफेल मुद्दयावर सीतारमण यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर राहुल यांनी नाराजी व्यक्त केली होती. आम्ही जनतेच्या न्यायालयात राफेल करारावर प्रश्न उठवला आहे. मोदींनी समोर येऊन राफेलवर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आम्ही केली होती. पण ५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधानांनी संसदेत पाऊल टाकण्याच साहस दाखवल नाहीये. सीतारमण यांनी अडीच तास राफेलवर भाषण दिलं. पण ते वाया गेलं आहे. काऱण त्यांनी एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. पंतप्रधान जनतेच्या न्यायालयातून पळून गेले असून सीतारमण मला वाचवा. मी स्वतचा बचाव करू शकत नाहीये. तुम्हीच आम्हाला वाचवा. पण अडीच तासाच्या भाषणात त्या मोदींना वाचवू शकल्या नाहीत. असे राहुल यांनी म्हटले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत