राहुल गांधींनी केल मोदींचं अभिनंदन

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त
‘मला कितीही शिव्या दिल्या तरी मी प्रेमाने बोलणार, ते माझं तत्वज्ञान आहे. प्रेम कधी हरत नाही. मात्र आज नवे पंतप्रधान निवडण्याचा दिवस आहे, तर मी त्याविषयीच बोलेन,’ असेही ते म्हणाले. ‘खरं सांगायचं तर आज मला काय वाटतं, कुठे चुकलं वगैरे चर्चा करण्याचा दिवस नाही. कारण भारताच्या नागरिकांनी नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला आहे. मोदी त्यांचे पंतप्रधान होणार आहेत आणि एक भारतीय म्हणून मी याचा आदर करतो,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल यांनी आवाहन केलं की, ‘घाबरून जाऊ नका, आपण एकत्र लढून आपल्या विचारधारेला जिंकून देऊ.’

भाजप आणि नरेंद्र मोदींचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, ‘आज जनादेशाचा दिवस आहे. मला जनादेशाला कोणताही रंग द्यायचा नाही. लोकांना वाटत आहे की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं. लोकांच्या मताचा मी आदर करतो.’ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. शिवाय अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही भाजपने राहुल गांधींना धोबीपछाड दिला आहे. आपला पराभव राहुल यांनी मान्य केला आणि आपण जनमताचा पूर्ण आदर करत असल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत राहुल यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अमेठीत स्मृती इराणी जिंकल्या आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेचा कौल स्वीकारतो. स्मृती इराणी प्रेमाने अमेठीच्या जनतेला सांभाळतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत