राहुल गांधींनी पद सोडणं हीच मोठी समस्या

नवी दिल्ली: महाराष्ट्र News 24 वृत्त 

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यावर आता पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे. त्यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षावरील संकट आणखी वाढलं असल्याचा त्यांनी सांगितलं आहे. आमचे नेते सोडून गेले हीच आमची मोठी समस्या असल्याचा त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जबाबदारीपासून पळ काढल्याचं आतापर्यंत दबक्या आवाजात बोललं जात होतं. मात्र, आता त्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी उघडपणे वक्तव्य केलं असून सर्वात मोठी समस्या म्हणजे आमचे नेतेच आम्हाला सोडून गेले आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं पक्षासमोरील संकट वाढले आहे. राहुल गांधींच्या या निर्णयामुळं लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही पक्षाला आत्मपरीक्षण करता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला अजूनही एकत्र येता आलेलं नाही, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत