रिक्षा उभी करण्यावरून दोन संघटनांच्या रिक्षाचालकांमध्ये वाद; भाजप पदाधिकाऱ्यांकडून चालकाला मारहाण

डोंबिवली: रायगड माझा वृत्त

शनिवारी रात्री बाबासाहेब यांना जानकी हॉटेलजवळील रिक्षा वाहनतळावरून काही रिक्षाचालकांनी बोलावून त्यांना अज्ञात स्थळी नेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. यानंतर तात्काळ बाबासाहेब यांचा भाऊ सिद्धार्थ आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्या वेळी बाबासाहेब रक्तबंबाळ आणि बेशुद्धावस्थेत शेलार नाका येथील रस्त्यावर पडले होते.

डोंबिवली पूर्वेतील जानकी हॉटेल येथे शनिवारी रात्री रिक्षा उभी करण्यावरून दोन संघटनांच्या रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. भाजप रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी रिक्षा संघटनेतील चालकाचे अपहरण करून त्यांना अज्ञातस्थळी नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत रिक्षाचालक गंभीर झाले जखमी असून त्यांच्यावर मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी दत्ता माळेकरसह त्याच्या इतर साथीदारांविरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून संजय चेचे, कृष्णा कल्याणकर यांना पोलिसांनी अटक केली आहे मारहाणीसंबंधीचा हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शेलार नाका येथे बाबासाहेब कांबळे हे रिक्षाचालक राहतात. भाजप रिक्षा संघटनेचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि त्यांच्या सहा कार्यकर्त्यांनी आपल्याला रिक्षा वाहनतळावरून अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप बाबासाहेब यांनी केला आहे. जखमी अवस्थेत बाबासाहेब यांना के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भाजप रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत