रिलायन्स गॅस पाईपलाईन अन्यायग्रस्त शेतकरी आत्महतेच्या पवित्र्यात !

अवसरे येथील ज्ञानेश्वर गायकर यांनी रिलायन्स गॅस प्रकल्प अधिका-यांना दिला इशारा…

नेरळ : कांता हाबळे 

कर्जत तालुक्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रिलायन्स प्रशासनाची दादागिरी सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मानसिक दबावाखाली आहेत. नेरळ जवळील अवसरे येथील शेतकरी ज्ञानेश्वर गणपत गायकर यांना आपल्या पूर्ण जमिनीचा मोबदला न देता अर्ध्याच जमिनीचा मोबदला दिला जाईल अशा प्रकारे धमकी देत असल्यांने या शेतकऱ्याने सदर जमिनीतच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
अवसरे येथील गणपत नागो गायकर यांच्या सामाहिक हिस्साच्या जमिनीतून रिलायन्स ईथेन गॅस पाईपलाईन जात असून २००७ मधील प्रकल्पात माझ्या सर्व्हे नं २६/१ मधील १९ गुंठे जमीनीवर या प्रकल्पाचा शिक्का लागला असून आताही दुसरी लाईन याच जमिनीतून जात असून कायदेशीररित्या मला कसत असलेल्या माझ्या मालकीच्या क्षेत्रफळाचा मोबदला मिळणे आवश्यक असताना रिलायन्स प्रशासन मात्र फक्त २.४ गुठ्याचाच मोबदला मिळेल असे सांगून तुम्ही काहीही केले तरी आम्ही बाकी क्षेत्रफळाचे पैसे देणार नाही अशी धमकीच जणू देत आहेत.
गेल्या पाच महिन्याहून अधिक वेळ या संदर्भात रिलायन्स गॅस प्रकल्प अधिका-यांना भेटून सविस्तर कागदपत्रांसह याबाबत पुर्ण कल्पना दिली असतानाही मला योग्य तो न्याय मिळत नसल्याने माझ्या उदर निर्वाहाची एकमेव जमिन असलेल्या क्षेत्रफळात रिलायन्स चा शिक्का सात बारावर लागल्याने ती जमिन कवडीमोल झाली आहे. माझ्यावर व माझ्या वृध्द वडलांवर वेळोवेळी दबाव व धमकावून खोदकाम केले, कोणत्याही प्रकारच्या पंचनाम्यावर सहया न करताही अशा प्रकारची धमकी दिली जात असून माझी जमिन बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतू, वेळप्रसंगी  स्वता अंगावर राॅकेल ओतून जीव देईन पण रिलायन्स ला माझ्या जमिनीत आता पाऊलही ठेऊन देणार नाही. असा इशारा शेतकरी ज्ञानेश्वर गणपत गायकर यांनी रिलायन्स प्रशासनाला दिला आहे.
रिलायन्स प्रशासनाने शेतकऱ्यांची बाजू समजावून तसेच त्यांच्याशी संपर्क करून त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला त्याला द्यावा अशी मागणी होत आहे. असे न झाल्यास कोणतीही दुर्दवी घटना घडल्यास या सर्व प्रकाराला रिलायन्स प्रशासन जबाबदार राहील असा शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिला आहे. 
या संदर्भात मी तहसिलदार, प्रांत तसेच नेरळ पोलिस स्थानकात पत्राद्वारेही दाद मागणार असून मला न्यायची अपेक्षा आहे. – ज्ञानेश्वर गणपत गायकर, शेतकरी, अवसरे
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत