रिसेप्शनमध्ये गिफ्ट म्हणून मिळाला बॉम्ब, नवऱ्यामुलासह तिघांचा मृत्यू

रायगड माझा ऑनलाईन | भुवनेश्वर

Image may contain: one or more peopleओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीये. एका लग्नात बॉम्बस्फोट झाल्याने नवऱ्यामुलासह तिघांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमींमध्ये नवऱ्या मुलीचाही समावेश आहे.

आनंदावर दुखा:चे विरजण
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दाम्पत्याचं पाच दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान अनेक जण नवोदित जोडप्यांना गिफ्ट्स देत होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने गिफ्ट म्हणून या जोडप्याला बॉम्ब दिला. या बॉम्बचा स्फोट झाल्याने नवऱ्यामुलासह तीन जणांचा मृत्यू झाला.

स्फोटानंतर उडाला एकच गोंधळ
स्टेजवर स्फोट झाल्याने तेथील परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. राऊरकेलाच्या रुग्णालयात नवरामुलगा आणि इतर दोघांना दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले गेले. गंभीर जखमी झालेली नवऱ्यामुलीवरही उपचार सुरु आहेत.

पोलिसांचा तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी तपास सुरु केला असून अद्याप बॉम्बची भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीचा तपास लागलेला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.