रुग्णालयामधून बेपत्ता झाला रुग्ण, दुस-या दिवशी आवारातच आढळला मृतदेह

पुणे:रायगड माझा 

 चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या आवारात बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. देवराम सावंत (वय 42-चक्रपाणी वसाहत) असे मृत व्यक्तीच नाव असून त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये गुरुवारी दुपारी आढळून आला.

मोहन सावंत यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात पोटाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र ते काल संध्याकाळी रुग्णालयातून निघून गेले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. आज दुपारी रुग्णालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला.तात्काळ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहन सावंत यांना दारूचे व्यसन होते मात्र 3 ते 4 दिवसांपूर्वीपासून त्यांनी दारू सोडली होती, त्यामुळेच त्यांना पोटाचा त्रास होऊ लागला होता.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील वार्डमधून रुग्ण न सांगता निघून जाण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. वार्डमधील सुरक्षारक्षक आणि वार्डबॉय यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत