रेती उत्खनन बंद असनातासुद्धा बांधकामासाठी रेती कोठून उपलब्ध होते?     

मुरुड : अमूलकुमार जैन 

रायगड जिल्ह्यात रेती उत्खनन बंद असतानासुद्धा खासगी बांधकामासाठी रेती कोठून उपलब्ध होत असते?असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्राम पंचायत हद्दीतील बोर्ली स्थानकावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर तीन ब्रास रेतीचा साठा पहाटे कोणत्यातरी माल वाहतूक वाहनाने खासगी कामासाठी आणून टाकला होता.
रायगड जिल्ह्यात रेतीचे लिलाव गेल्या काही वर्षापासून बंद असताना सुद्धा ही रेती कोठून येत आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. खासगी कामासाठी रेती उपलब्ध होते. मग अनेक शासकीय बांधकामे ही रेती उपलब्ध होत नसल्याने अनेक वर्षे अर्धवट स्थितीत बंद आहे. एकीकडे महसूल विभागाचे अधिकारी अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात कारवाई नाममात्र करत असल्याचा कांगावा करीत असतात.
जिल्ह्यात आज अनेक शासकीय बांधकामे रेती अभावी बंद स्थितीत असतानासुद्धा अनेक खासगी कामासाठी मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध कोठून उपलब्ध होते ह्याची माहिती शासनाच्या अधिकारी कर्मचारी याना माहीत आहे.मात्र एक जण मारण्याचे नाटक करीत आहे तर दुसरा रडण्याचे नाटक करीत असल्यासारखा वागत असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.काही महिन्यांपूर्वी  अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी यांनी रेवदंडा साळाव पुलानजीक अनधिकृतरित्या रेती उत्खनन करणाऱ्या पाच रेती उत्खनन करणारे सॅक्सशन पंप सुमद्रात बुडविले होते.तर गेल्या महिन्यात लालचंद नामक व्यक्तीवर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र त्याचे नंतर काय झाले हे कोणासही समजले नाही.
 मूलकुमार जैन
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत