रेल्वेचा प्लॉट पार्किंगसाठी मिळावा; ग्रामपंचायतीची रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मागणी

नेरळ – कांता हाबळे
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी नेरळ रेल्वे स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांची पाहणी केली. यावेळी नेरळ ग्रामपंचायतीने रेल्वे प्रशासनाकडे पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी पार्किंग प्लॉट मिळावा अशी मागणी वर्षाभरापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. तो पार्किंग प्लॉट लवकरात लवकर पार्किंगसाठी मिळावा अशी मागणी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थाक एस. के. जैन यांच्याकडे नेरळ ग्रामपंचायतीने केली.
     नेरळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांची कामे सुरू असून काही प्रमाणात हे रस्ते रुंद होत असले तरी नेरळ शहरात पार्कींगची समस्या गंबीर बनली आहे. याकडे नेरळ ग्रामपंचायतीसह पोलिसांनही दुर्लंक्ष केले आहे. रस्तावर दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने तसेच रिक्षां चालकांनी रस्ते अडविल्याने पादचार्‍यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
     ही समस्या सोडविण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीकडून प्रयन्त सुरू आहेत. त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश म्हसकर, नितेश शहा, सदानंद शिंगवा यांनी भेट देऊन रेल्वेच्या समस्या संदर्भात व्यवस्थापकांशी चर्चा केली. व पार्किंग प्लॉट देण्यात यावी अशी विनंती यावेळी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. रेल्वे परिसरात जर पार्किंग ची व्यवस्था झाली तर नेरळ शहरात पार्किंगची समस्या भेडसावत आहे आणि त्यापासून अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या त्रासापासून नेरळकरांची थोड्या प्रमाणात सुटका होणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत