रेल्वेचे सीट डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू, साडेचार लाखांची भरपाई

रायगड माझा वृत्त 

सविता यांच्या वरच्या बाजूला असलेले बर्थ आणि त्यावरील सामान त्यांच्या डोक्यावर पडले. त्यांना उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. रेल्वेचे सीट डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू, साडेचार लाखांची भरपाई रेल्वे प्रवासादरम्यान डोक्यावर सीट आणि सामान पडून मृत्यू झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई मिळणार आहे.

ग्राहक मंचाने भारतीय रेल्वेला दिलेल्या आदेशात मृत महिलेच्या कुटुंबीयांना ४.४४ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. २०११ मध्ये गुजरातमधील हिम्मत नगरच्या ग्राहक मंचाने १.९२ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्यात राज्य ग्राहक मंचाने वाढ करत भरपाईची रक्कम ४.४४ लाख रुपये केली.

मिळालेल्या माहितीनुसार, साबरकांढा येथील दोदाद गावात राहणाऱ्या सविता तारल या २००९ मध्ये आपल्या कुटुंबीयांबरोबर खेडब्रह्मा-तलोड रेल्वेने प्रवास करत होत्या. रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे सविता यांच्या वरच्या बाजूला असलेले बर्थ आणि त्यावरील सामान त्यांच्या डोक्यावर पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्या वाचू शकल्या नाहीत. सविताचे पती आणि त्यांच्या मुलांनी रेल्वेवर ६.५ लाखांचा दावा दाखल केला. ग्राहक मंचाने २०११ मध्ये ६ टक्के व्याजासह १.९२ लाखांची भरपाई देण्याचा निर्णय सुनावला. परंतु, कुटुंबीय ही रक्कम स्वीकारण्यासाठी तयार नव्हते. हे प्रकरण राज्य ग्राहक मंचात गेले. तेव्हा त्यांनी दर महिना ३ हजार रुपये उत्पन्न गृहीत धरुन ३.८४ लाखांची भरपाई निश्चित केली. त्याचबरोबर सविता यांच्या मुलांचे भावनिक नुकसान झाल्याबद्दल ३० हजार रुपये, अंत्यसंस्कारसाठी १५ हजार आणि मानसिक त्रास तसेच कायदेशीर खर्चासाठी १० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत