रेल्वे प्रशासन व ठेकेदारांचा हलगर्जीपणा; ३ मुलींचा खड्ड्यात बुडून मृत्यू

पनवेल : साहिल रेळेकर 

Image result for PANVEL 3 girls death

पनवेल रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी तसेच पनवेल आणि नवीन पनवेलला जोडणाऱ्या सबवेच्या निर्मितीसाठी केलेल्या खोदकामात तीन लहान मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल  घडली. या घटनेबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत १५ फुटी खड्डा खोदला होता. ज्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. या डबक्यात तीनही मुली खेळण्यासाठी गेल्या असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. रेशम भोसले (१३), रोहिता भोसले (१०) आणि प्रतीक्षा भोसले (०८) अशी मृत मुलींची नावे आहेत. या तिघीही मूळच्या अमरावतीच्या असून कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करायच्या. तेथील खड्ड्यातील पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न
आल्याने या तीनही मुली पाण्यात बुडाल्या. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच पुन्हा एकदा ३ जणींना नाहक जीव गमवावा लागला. या घटनेनंतर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे समोर येत असून यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत