रेल्वे रुळाला तडे, ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे. घाटकोपर ते विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू केले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी 10:30 च्या सुमारास घाटकोपर-विद्याविहार दरम्यान अप जलद मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्याचे आढळले. त्यानंतर जलद लोकल धिम्या गतीनं चालवल्या जात आहेत. त्याचा परिणाम उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला असून प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत