रेल्वे स्थानकांवर गुन्ह्यांचे नियंत्रण करणाऱ्या रेल्वे पोलिसांना मिळणार दिलासा

मुंबई: रायगड माझा वृत्त 

रेल्वे स्थानकांवरील गर्दीत वाढ झाल्यामुळे गर्दी नियंत्रणांचे नवे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिसांसह (जीआरपी) , रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) , महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) आणि होमगार्ड अशा सुरक्षा यंत्रणा आहेत. १ जानेवारी २०१८ रोजी मुंबई पोलिस दलातील तत्कालीन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांना आठ तास ड्युटी करण्याचा निर्णय घेतला होता.

व्हीआयपी बंदोबस्तामध्ये ड्युटीचा कालावधी १६ तासांपेक्षा जास्त असल्याने अनेक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. रेल्वे स्थानकांवर गुन्ह्यांचे नियंत्रण करणाऱ्या रेल्वे पोलिसांना अखेर दिलासा मिळणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आठ तासांच्या ड्युटीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार असून १ ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांना आठ तास ड्युटी लागू होणार आहे.

यामुळे रेल्वे पोलिसांनाही आठ तास ड्युटीचा नियम लागू करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत होती. लोकल महिला डब्यात गस्त, रेल्वे हद्दीत होणारे अपघात, चोरीचे गुन्हे नोंदवून तपास करणे आणि अतिसंवेदनशील ठिकाणी खडा पहारा यामुळे रेल्वे पोलिसांना सुमारे १२ ते १४ तास ड्युटी करावी लागते.   यानंतर रेल्वे पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी वर्गानेही आठ तास ड्युटीची मागणी केली होती.  सर्वप्रथम ‘ऑन फिल्ड’ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे आठ तास करण्यात येणार असून या नंतर टप्प्याटप्प्याने सर्व रेल्वे पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यात येईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत