रेवदंडा एस्टी बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था; बसस्थानकाचीही दिवसेंदिवस वाताहत

अलिबाग (रेवदंडा) : मिथुन वैद्य

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा एस्टी बसस्थानकाची गेल्या काही दिवसांपासून पूर्णतः वाताहत होताना दिसत आहे. रेवदंडा बसस्थानकात एरव्ही मोठी प्रवाशी संख्या पहायला मिळाची. मात्र कोरोना प्रादुर्भाव मुळे करण्यात आलेले लॉकडाऊन मुळे एस्टी बससेवा देखील लॉकडाऊन होती. मात्र अनलॉक होऊन देखील रेवदंडा येथील बसस्थानकात प्रवाशाची फरशी वर्दळ दिसत नसून
त्यात भरीसभर रेवदंडा एस्टी बसस्थानकातील स्वच्छता गृहाची देखील नासधूस झाले आहे. छप्पर देखील उडून गेले आहे. परिणामी जे काही तुरळक प्रवाशी येत आहेत ना पाण्याची सोय ना धड स्वच्छता गृहाची सोय परिणामी नाहक त्रास प्रवाशांना होत आहे.

तर दुसरी कडे  एस्टी बस संदर्भात चौकशी कक्ष देखील बंद असून प्रवाशांनी तक्रार अथवा एस्टी बस बाबत चौकशी करायची तरी कुठे हाच प्रश्न प्रवाशांन सामोर निर्माण झाला आहे. त्यामुळे रेवदंडा एस्टी बस स्थानककडे कोणी लक्ष देईल आहे की नाही आसच प्रश्न निर्माण झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत