रेवदंडा ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद

 कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य:-सोनाली मोरे

मुरूड जंजिरा : अमूलकुमार जैन

अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवार तथा माजी सदस्य शुभांगी गोंधळी  यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रेवदंडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनवचैतन्य निर्माण झाले असून आता ते जोमाने निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कामाला लागले असल्याचे विद्यमान सरपंच सोनाली मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
 रेवदंडा ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षाच्या माजी सरपंच शुभांगी गोंधळी यांनी पाच क्रमांकाच्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना न्यायालयाने सहा वर्षे निवडणुकीस बंदी घातलेली आहे.असे आदेश असताना सुद्धा  गोंधळी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.मात्र पाच नंबर प्रभागातील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या निकिता मानकर यांनी उमेदवारी अर्ज छाणनीच्यावेळी गोंधळी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला.
त्यांनी आक्षेप घेताना निवडणूक अधिकारी यांना सांगितले की,कोकण आयुक्त यांनी शुभांगी गोंधळी यांचा सदस्यपद आणि सरपंचपद रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विरोधी उमेदवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या रिट पिटीशन चा निकाल 16 मार्च 2016 रोजी लागला असून न्यायालयाने त्यांचे रिट पिटीशन दाखल केले होते.महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम कायद्यातील 1958च्या कलम 14 मध्ये सदस्य  बाद झाल्यास त्यास पुढील पाच वर्षापर्यंत कुठल्याही निवडणुकीत  सहभागी होता येत नाही अशी कलम14 पोट कलम1.अ आणि ड मध्ये तरतूद आहे.दिं.19 जुलै 2017 च्या अध्याआदेशानुसार या मुदतीत वाढ करण्यात येऊन ती सहा वर्षे एवढी करण्यात आली आहे. या मुळे रेवदंडा ग्रामपंचायत  वातावरण शिगेला पोचले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.