रोजगार हमीच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील गडकिल्‍ल्‍यांचे संवर्धन

अभिमान महाराष्‍ट्राचा योजनेची जयकुमार रावल योनी केली घोषणा
किल्‍ले रायगडावर पार पडली दुर्ग परिषद

महाड : सिद्धांत कारेकर

राज्‍यातील गडकिल्‍ल्‍यांच्‍या संवर्धनाच्‍या दृष्‍टीने एक चळवळ उभी रहावी या हेतूने आज किल्ले रायगडावर दुर्ग परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकिल्‍ल्‍यांच्‍या संवर्धनासाठी रोजगार हमीच्‍या माध्‍यमातून अभिमान महाराष्‍ट्राचा ही योजना पर्यटन व रोजगार हमी खात्‍याचे मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

किल्‍ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे,रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, सांस्कृतीक विभागाचे सचिव भुषण गगराणी यांच्यासह वनविभाग, पुरातत्व विभाग, रायगड विकास प्राधिकरण आणि महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील तीनशे नोंदणीकृत किल्ल्यांवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन काम करण्यासाठी अभिमान महाराष्ट्राचा ही योजना रोजगार हमी व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केली. या माध्यमातुन एकाच वेळी महाराष्ट्रातील तीनशे किल्ल्यांवर रोजगार हमीच्‍या माध्‍यमातून गड संवर्धनाचे काम केले जाणार आहे. त्‍यातून गडसंवर्धनाबरोबरच रोजगराचीही निर्मिती होईल असे रावल यांनी यावेळी सांगितले. प्रश्‍नोत्‍तरे  आणि खुली चर्चा अशा स्वरूपात दोन सत्रांमध्‍ये ही परीषद घेण्यात आली. संयुक्‍त समितीच्‍या माध्‍यमातून किल्ले पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींची नोंद करणे,दुर्गसंरक्षक म्हणुन स्थानिक दुर्ग संवर्धन संस्थांची नेमणुक करणे, मानधन तत्‍वावर प्रत्येक गडावर गडपाल नियुक्ती करणे, फोर्ट फेड्रेशन स्थापन करून सर्व संस्थांना एका छताखाली आणुन संवर्धनासाठी प्रयत्न करणे आदी प्रश्न हाताळण्यात आले तर खुल्या चर्चेचे वेळी रोपवे वर नियंत्रण, खाजगी मालकीतील एतिहासिक वास्तुंचे संवर्धन, गड किल्ल्यांवरील वणवे, तेथील  अनधिकृत बांधकामांसाठी समिती, प्रत्येक गड किल्ल्यांवर प्लास्टीक बंदी या विषयांवर चर्चा करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत