रोहा तालुक्यात प्रस्थापितांना धक्का!

रोह्यात शेकाप3, राष्ट्रवादी 2, सेना 1, अपक्ष 1 ग्रामपंचायतीवर सरपंच विराजमान

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यातील निवडणूकीचा निकाल धक्कादायक लागला असुन प्रस्थापित उमेदवरांना मतदारांनी घरी बसवले असुन नव्या दमाच्या तरूणांना संधी दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शेकाप बरोबर शिवसेनने मुसंडी मारली असुन राष्ट्रवादी पक्षाने या ग्रामपंचायती निवडणूकीत 4 ग्रामपंचायती गमावल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.रोहा तालुक्यात सोमवारी निकाल हा शेकाप व शिवसेनेला पोषक ठरला आहे.या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रोहा तालुका शेकापचे 3 ग्रामपंचायतीवर सरपंच तर राष्ट्रवादीचे दोन ग्रामपंचायतीवर सरपंच विराजमान झाले असले तरी सुध्दा शिवसेनेची मुसंडी वाखण्याजोगा ठरला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून शेकाप बरोबर आघाडी करीत शिवसेनेने ही ग्रामीण भागात पाळेमुळे रोवली आहे.उध्देश वाडकर यांनी कोकबन ग्रामपंचायत राष्ट्रवादी कडून खेचुन आणली आहे. आपली पत्नी उर्वशी वाडकर यांना निवडून आणुन शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.

तालुक्यातील शेकाप शिवसेना युती असलेल्या ग्रामपंचायती मध्ये न्हावे राजेश्री विठोबा न्हावकर शेकाप, विरझोली ग्रामपंचायीवर शेकापचे प्रियंका प्रकाश धुमाळ सरपंचपदी विराजमान झाले आहेत.भातसर्इ ग्रामपंचायतीमध्ये शेकापने मुसंडी मारीत गणेश खरीवले यांनी सरपंचपदी साठी बाजी मारली आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या कोकबन ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी पक्षाची मक्तेदारी मोडीत काढुन उर्वशी उध्देश वाडकर या शिवसेनेच्या उमेदवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.तर सानेगाव ग्रामपंचायतीवर अपक्ष स्वप्नाली संतोष भोर्इर यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढसळुन बाजी मारली आहे.राष्ट्रवादीने आपला येरळ व तांबडीचा गड राखला आहे.येरळ विमल चिंतामणी दळवी या तर तांबडी मध्ये रणजीत म्हांदळेकर सरपंचपदी विराजमान झाले आहेत.

रोहा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे तीन ग्रामपंचायतीवर सरपंच, राष्ट्रवादीचे दोन ग्रामपंचायतीवर, शिवसेना 1 व अपक्ष एका ग्रामपंचायतीवर सरपंच विराजमान झाला आहे.या निवडणूकीत शेकाप 1 नंबर असुन त्या पाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष असला तरी सुध्दा या निवडणूकीत शिवसेनेची मुसंडी वाखण्या जोगा आहे.शिवसेना एका ठिकाणी सरपंच तर दोन ठिकाणी शेकाप बरोबर युतीत आहे.या निवडणूकीत राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का बसला असुन राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नंदकुमार म्हात्रे, हरीचंद्र वाजंत्री, जगनाथ कुंडे व तालुक्यातील ज्येष्ठ नेते लिलाधर थोरवे यांना मात्र पराभवाचा धक्का बसला आहे.

रोहा तालुक्यात 7 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर 6 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या पोटनिवडणूका झाल्या आहेत.या मध्ये येरळ ग्रामपंचायतीवर सरपंचासह 9 सदस्य राष्ट्रवादी, कोकबन सरपंच सेना, सदस्य सेना 5, राष्ट्रवादी शेकाप आघाडी 4, भातससर्इ सरपंच शेकाप, सदस्य शेकाप 4, ग्रामविकास आघाडी 1, राष्ट्रवादी 4, सानेगाव सरपंच अपक्ष, सदस्य 7 अपक्ष, राष्ट्रवादी 2, न्हावे सरपंच शेकाप शिवसेना आघाडी सरपंच शेकाप , सदस्य शेकाप शिवसेना आघाडी 8, एक रिक्त, विरझोली सरपंच शेकाप शिवसेना आघाडी सरपंच शेकाप, सदस्य शिवसेना शेकाप सर्व पक्षीय आघाडी 7, राष्ट्रवादी 2, तांबडी सरपंच राष्ट्रवादी, सदस्य राष्ट्रवादी 4, शेकाप 1, अपक्ष 4, 6 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत ऐनघर संजय लक्ष्मण कनगरे शिवसेना, खांब भारती संजय खामकर राष्ट्रवादी, मालसर्इ सुुजाता रविंद्र मोहीते राष्ट्रवादी, धामणसर्इ शंकर भगवान काते शिवसेना हे विजयी झाले आहेत.

रोहा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत शेकाप 1 नंबरचा पक्ष ठरला असुन भविष्यात रोहा तालुक्यात आ.जयंत पाटील, आ.धैर्यशील पाटील, आ.पंडित पाटील व जिप.उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापच ग्रामपंचायत निवडणूकीत 1 नंबरचा पक्ष राहील. राजेश सानप : शेकाप तालुका चिटणीस

रोहा तालुक्यातील जनतेने शिवसेनेला चांगला कौल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिल्याने जनता आमच्या पाठीशी आहे. त्यांचे विशेष आभार मानत असताना येत्या विधानसभा निवडणूकीत आम्ही शिवसेनेची ताकत दाखवून देऊ. : समिर शेडगे : शिवसेना तालुका प्रमुख

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत