रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी राजश्री पोकळे यांची बिनविरोध निवड

विकास कामाची सुत्रे व सर्वसामान्यांची नाळ ओळखल्याने गेली 50 वर्ष आमच्याकडे पंचायत समिती सत्ता : आ.सुनील तटकरे

रोहे : महादेव सरसंबे

रोहा पंचायत समिती सभापती विणा चितळकर यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत समझोतानुसार राजीनामा दिल्यानंतर या जागेसाठी झालेल्या निवडणूकीत एकमेव अर्ज राजश्री पोकळे यांचा निवडणूक अधिकारी रविंद्र बोंबले यांच्या कडे आल्याने राजश्री पोकळे या रोहा पंचायत समितीच्या सभापती बिनविराध निवडून आल्या आहेत. आ. सुनील तटकरे व जिल्हा परीषद अध्यक्षा आदीती तटकरे यांची विशेष उपस्थिती होती.

निवडीनंतर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, नेतेगण, कार्यकर्ते यांनी सत्कार केला. दुपारी बाराच्या सुमारास सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर औपचारीक निवडणूक प्रक्रियेचा भाग दोन वाजता पुर्ण झाल्यानंतर राजश्री पोकळे या रोहा पंचायत समितीच्या सभापती पदी बिनविरोध झाल्याचे या वेळी घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी च्या कार्यकत्र्यांनी विशेषता कोळी समाजाला बहुमान सभापती पदाचा मिळाल्याने त्यांनी जल्लोष साजरा केला.

यावेळी मावळते सभापती वीणा चितळकर, उपसभापती विजया पाशिलकर, पंचायत समिती प्रतोद रामचंद्र सकपाळ, गुलाब वाघमारे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, माजी सभापती लक्ष्मण महाले, राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजयराव मोरे, धाटाव सरपंच विनोद पाशिलकर, जिल्हा परीषद माजी सदस्य नंदकुमार म्हात्रे, रोहा नगरपरीषद सभापती समिर सकपाL, नगरसेवक अमित उकडे, ज्येष्ठ नेते मारूतीराव खरीवले, बाबुराव बामणे, शंकरराव भगत, युवक अध्यक्ष किरण मोरे, तानाजीराव देशमुख, गणेश मढवी, प्रदिप चोरगे, शिवराम शिंदे, अनिल भगत, हसमुख जैन, महेंद्र पोटफोडे, हेमंत ठाकूर, भार्इ पोकळे, संदिप चोरगे, रामा म्हात्रे, अमित मोहीते, राकेश गुरव, गणेश शिवलकर, किसन मोरे, तानाजी कारभारी, नथुराम तांडेल, केशव पाटील, अनंत चौलकार, चंद्रकांत पाटील, विजय भोर्इ, अनिल वाटवे, चंद्रकांत पोकळे, रामचंद्र चितळकर, संतोष कोळी, प्रकाश जाधव, विकास पाटील, सुनील चोरगे, मनोज शिर्के, चिंतामणी खांडेकर, विलास टोमकर, अमोल टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आमदार सुनील तटकरे यांनी विकासकामाची सुत्रे व जनतेची नाळ ओळखल्याने गेली 50 ते 60 वर्ष आमच्याकडे सत्ता आहे. सदानंद गायकर व नामदेव चोरगे यांच्या नंतर राजश्री पोकळे तुम्हाला संधी मिळाली आहे. आव्हाने मेाठी आहेत, तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. वट पोर्णिमाच्या पवित्र दिवशी ही जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत असल्याचे आ|. सुनील तटकरे यांनी सांगत राजश्री पोकळे यांना शुभेच्छा दिल्या. पंढरीनाथ यांनी आभार मानताना आमच्या ग्रामपंचायतीला आ. सुनील तटकरे यांनी जो बहुमान दिला आहे. त्याचे आम्ही आमच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचे सांगितले.

अनंत गीते तुम्हाला सुनील तटकरे समजायला खुप वेळ लागेल. निवडणुकीच्या आधी 500 मतांनी निवडून येणे, 100 टक्के नव्हे तर 200 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमचा उमेदवार निवडून येर्इल हे सांगितले, आमदार खासदार व मंत्री सारेजण तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्यास आणले होते. परंतु पराभुत झाल्यावर 10 दिवस कुठे गायब झाले होते. हे जनतेला सांगा. म्हणे मी उपकाराची परत फेड केली. गीते आधी तुमच बघ, नाणारच बघा मग आमच्या वर टिका करा!

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत