रोहा प्रेस क्लब उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित

धाटाव :शशिकांत मोरे
      मराठी पत्रकार परिषद आयोजित सातारा जिल्ह्यातील पाटण तालूक्यात राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा व जिल्हा व तालुका आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार रोहा प्रेस क्लब या पत्रकारांच्या संघटनेला देउन सन्मानित करण्यात आले आहे.रोहा तालुक्यात प्रेस क्लबला मिळालेल्या सन्मानाचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
     जिल्हा व तालुका पातळीवर समाजपयोगी उल्लेखनीय काम केल्याबद्दल विविध जिल्हा व तालुका पत्रकार संघाला या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यामधे कोकण विभागातुन रोहा तालुक्यातील रोहा प्रेस क्लब या संघटनेला उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्कार सन्मान सिक्किमचे राज्यपाल महामहिम डॉ.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री विक्रमसिंह पाटिल,पाटणचे आमदार शंभुराजे देसाई,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यविश्वस्त आदरणिय श्री एस.एम.देशमुख,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा,विश्वस्त किरणजी नाईक,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस समीर देशपांडे,अधिस्वीकृति समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष मिलिंदजी अष्टिवकर,सातारा जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष हरीश पाटणे,पाटण तालुका पत्रकार संघाचे शंकर मोहिते यांसह इतर मान्यवारांच्या उपस्थितित प्रदान करण्यात आला. दरम्यान हा सन्मान मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधि पराग फूकणे,रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश बामुगड़े,कार्याध्यक्ष शशिकांत मोरे,सल्लागार सुहास खरिवले,नरेश कुशवाह व पदाधिकारी वर्गाने स्वीकारला.याप्रसंगी सबंध महाराष्ट्रातून अंदाजे हजार ते बाराशे पत्रकारानी हजेरी लावली होती.
     रोहा प्रेस क्लबने आजवर गरजू विद्यार्थी शैक्षणिक दत्तक योजना राबवून असंख्य विद्यार्थ्याना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील गरजुना आर्थिक मदत दिली आहे.याबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,कला गुणाना वाव देण्यासाठी प्रोत्साहनात्मक कार्यक्रम,तर आदिवासी बांधवासाठी विविध कार्यक्रम राबविले आहेत. जागतिक महिला दिन,प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान यांसह पर्यावरणासाठी वृक्ष लागवड मोहिम अशा वीविध समाजभिमुख कार्याची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात रोहा प्रेस क्लब या संघटनेला सन्मानित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातिल विविध स्तरातून संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाबरोबर पुढील वाटचालिस शुभेच्छा देण्यात आल्या.रोहा प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकार्यानी याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत