रोहा बस स्थानकात खाजगी वाहनांची अवैध पार्किंग!

रोहे : महादेव सरसंबे

सुंदर व स्वच्छ रोहा बस स्थानकाची ओळख निर्माण झाल्याने प्रवाशांना रोहा बस स्थानक सुखकार वाटत आहे.परंतु रोहा बस स्थानकात मोकळी जागा पाहुन खाजगी दुचाकी वाहनधारक बिनधास्त पणे आपली वाहने उभी करीत असल्याने बस स्थानकात येताना व जाताना बस चालकांना त्रासदायक ठरत आहे.या संबीधीत बस स्थानकातील वाहतुक नियंत्रक सातत्याने लाऊडस्पीकरवरून सुचना देत असताना ही वाहन चालक मात्र बिंदास्त बसस्थानकाच्या आवारात आपली खाजगी वाहने उभी करीत असल्याने वाहतुक नियंत्रक व बस चालक हैराण झाले आहेत.महत्वाचे म्हणजे वेगात दुचाकी वाहनधारक आपली वाहने बस स्थानकाच्या आवारातून नेत असल्याने अपघात होण्याची संभवाना आहे.आज तरी प्रवाशांना हे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

 


रोहा बस स्थानक हे खाजगीकारणातून बांधलेले रायगड जिल्हयातील पहीले आहे.आ ़सुनील तटकरे मंत्री असताना हे बस स्थानक त्यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आले.दोन वर्षा पुर्वी मोठया प्रमाणात बस स्थानकात खडे होते परंतु त्यानंतर त्याचे डांबरीकरण झाल्याने आज रोहा बस स्थानकाचे आवार चकाचक आहे.महत्वाचे म्हणजे आज त्याची निगा ही चांगली राखत असल्याने रोहा बस स्थानक टाकाटक दिसून येत आहे.या बस स्थानकाला आज मात्र दुचाकी व चारचाकी वाहनांचे अवैद्य पार्किंगचे ग्रहण लागले आहे.बस स्थानकात ठिक ठिकाणी अवैध वाहने उभी करू नये अशा सुचना लिहीण्यात आल्या आहेत.परंतु तरी सुध्दा नागरीक या ठिकाणी आपली वाहने पार्कींग करीत आहेत.या ठिकाणी पार्किंग केल्यास दंड घेतले जार्इल असा सुचना ही देऊन सुध्दा खाजगी वाहन चालक एैकत नाही तर काही वेळी अवैध वाहन पार्किंग वाहन करून वर पुन्हा हेच वाहन चालक वाहतुक नियंत्रकाशी हुज्जत घालित आहेत.

मध्यतंरी बार्इक स्टंट या अवारात होत असताना वाहतुक पोलिस चेअरकर व धायगुडे यांनी त्यांना प्रतिबंध करून कारवार्इ केल्याने तरूण मुलांचे आज स्टंट बाजी बंद झाली आहे.परंतु आज खाजगी वाहनधारक पार्किेग बिंनदास्त करीत असताना वाहतुक नियंत्रकांना ही डोके दुखी ठरत आहे.बस स्थानकात येताना जाताना दोन्ही बाजुनी वाहने उभी करण्यात येत असल्याने एखादा वाहनाला धक्का लागल्यास वादावादी होऊ शकते परंतु हे होऊ नये यासाठी बस चालक कसरत करून ही वाहने बस स्थानकात आणत आहे. एखादा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने या खाजगी वाहन धारकांवर कडक कारवार्इ करण्याची गरज आहे.असे बोलले जात आहे.

खाजगी वाहने बस स्थानकाच्या आवारात येत असल्याने अपघात होण्याची संभवना आहे.महत्वाचे म्हणजे या गाडयांचा प्रवाशाना व बस चालकांना त्रास होत आहे.वाहतुक निंयत्रक म्हणुन आम्ही सारे सातत्याने अवैध पार्किंग रोहा बस स्थानकात करू नका असा सुचना देत आहोत.खाजगी वाहन चालकांनी नागरीकांच्या व प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीकोनतुन रोहा बस स्थानकत अवैध पार्किंग व वाहतुक करू नये.

बळीराम बडे वाहतुक नियंत्रक रोहा बस स्थानक

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत