रोहा शहरचा सर्वांगिण विकास साधणार : सुनील तटकरे

रोहे : महादेव सरसंबे

माझे व रोह्माचे अतुट नाते आहे, रोहा शहराने भरभरून प्रेम दिल्याने मी सभागॄहात काम करू शकलो याचे उत्तरदायीत्व म्हणुन रोह्मात मी काम करीत असताना रोह्माच्या 30 वर्षाच्या भविष्याचा विचार करून कामाचे नियोजन करण्यात आले आहे. भुयारी गटारे, पाणी योजना, रस्ते हे तर होणारच आहे. पाणी, रस्ते व वीज या पुरते विकास रोहा शहारचा सिमीत न राहता रोहा शहाराचा सर्वांगिण विकास साधायचे आहे. महाराष्ट्रातील पर्यटक जेव्हा रोह्मात येतील त्यावेळी साबरमती, गोदावरी काठ या सारखे भव्य स्वरूपात कुंडलिका नदीच्या तीरावर सौंदर्य कुंडलिका नदी संवर्धनाच्या माध्यमातून दिसेल. असे सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

रोहा अष्टमी नगरपरीषदेच्या वतीने गुरूवारी सुनील तटकरे यांच्या हस्ते रोहा अष्टमी नगरपरीषद हद्दीतील विविध विकासकामांचे भुमिपुजन, उदघाटन व नामकरण सोहळाच्या प्रसंगी आयोजित ज्येष्ठ नागरीक सभागॄहात सभेत बोलत होते. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रोहा पंचायत समिती सभापती राजश्री पोकळे, उपसभापती विजया पाशिलकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजयराव मोरे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, गटनेते महेंद्र दिवेकर, सभापती महेश कोलाटकर, समिर सकपाळ, स्नेहा अंबरे, सुजता चाळके, नगरसेवक शिल्पा धोत्रे, महेंद्र गुजर, अहमद दर्जी, सारीका पायगुडे, अमित उकडे, अखलाक नाडकर, अब्दुल रहेमान चोगलेआदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर टिका करताना भाजप शिवसेना सरकाचे 4 वर्ष होत आले आहेत. त्या मंत्रिमंडळात केंद्रिय मंत्री म्हणुन गीतेंना 4 वर्ष पुर्ण होत आहे. त्यांनी मुंबर्इ गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी काय केले ते सांगा अन्यथा 100 मिटर सलग रस्ता दाखवा व 2000 हजार रूपये मिळावा. असे जाहीर केले. लोकसभेत मोदी सरकारवर अविश्वास ठराव आणला. सेना या सरकारवर सत्तेत आहेत, त्यांनीच अविश्वास ठरावावर बहीस्कार टाकला याचा अर्थ शिवसेनेची दुपटटी भुमिका असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले.

या वेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी रोहा शहाराचा कायापालट आ. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून झाला आहे. रोह्मात भविष्यातील पुढील 30 वर्षाचा विचार करूनच विकास साधला जात आहे. शहारातील विविध कामे आ. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून मी व माझी टिम करीत असल्याचे सांगितले.

गुरूवारी दिवसभरात आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते फिरोज टॉकीज येथील मौलाना अबुल कलाम आझाद प्रवेशव्दार भुमिपुजन, मरहुम इक्बाल उमर शेटे मार्ग नामकरण सोहळा, बोधले घर गल्ली, मरहुम अब्दुल रहेमान बोधले मार्ग नामकरण, इब्राहीम सवाल मार्ग वरचा मोहल्ला नामकरण, करीम दर्जी मार्ग नामकरण सोहळा, खालचा मोहल्ला रस्त्यास जामे मस्जीद मार्ग नामकरण, बाजारपेठ जोड रस्त्यास कै. प्रभाकार उर्फ नानासाहेब बारटक्के मार्ग नामकरण, काळे उद्यान जाणारा रस्ता कै. प्रभाकर अनंत साठे मार्ग, मेहंदळे हायस्कुल ते कचेरी रोडकडे जाणारा रस्ता राजाभाऊ आवळसकर सर मार्ग नामकरण, अंधार आळी येथे स्वागत कमानीचे भुमिपुजन, दमखाडी सागर डेअरी जिजामाता चौक नामकरण, एक्सेल कॉलनी रोड श्रीमती शैलजा उर्फ मार्इ जगताप मार्ग नामकरण, कोर्ट रोड दमखाडी परीसर श्री स्वामी समर्थ नगर नामकरण, श्री संत शिरोमणी गोरोबा काका नगर दमखाडी नामकरण, डॉ.सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन( दाउदी बोहरा समाज आदाम हॉल) मार्ग नामकरण, धनगर आळी चौकास श्री सार्इ मल्हार चौक धनगर धनगर आळी नामकरण, कुंडलिका नदी व वैकुंठ धाम रस्त्यास कै.रामभाउ दिवेकर मार्ग नामकरण, आदी कार्यक्रमाचे रोहा अष्टमी नगरपरीषदेच्या वतीने आयोजित केले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व त्यांचे सर्व सभापती, नगरसेवक व मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत