रोहित पवार अचानक सलूनमध्ये, जामखेडमध्ये सलूनवाल्याची भंबेरी

रायगड माझा वृत्त 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आज जामखेडच्या सलूनमध्ये जाऊन दाढी केली. खुद्द राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपल्या सलूनमध्ये दाढी केल्याने सलून मालकाची मात्र तारांबळ झाली होती.

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. रोहित पवार यांचा सध्या या मतदारसंघातील वावर वाढला आहे. आज एका ल्कार्य्क्रमाच्या निमित्ताने रोहित पवार जामखेडमध्ये होते. यावेळी त्यांनी जामखेडच्या एका छोट्या सलून दुकानात जाऊन दाढी करुन घेतली. जामखेड दौऱ्यावर असताना अचानक सलून दुकानात जाऊन कटिंग केली.थेट रोहित पवार आपल्या दुकानात आल्याचे पाहून सलूनचालक संदीप राऊतची चांगली धावपळ उडाली. कंगवा कात्री चालवताना संदीप थोडं अडखळला, मात्र अखेर हात बसल्यावर संदीपनेही मग कमाल दाखवली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत