रोहित पवार की संग्राम जगताप ? मंत्रिपद कोणाला ?

Image result for rohit pawar sangram jagatap"

महाराष्ट्र News 24 वृत्त

महाआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक मंत्रीपद मिळणार आहे. जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. तथापि आमदारकीची सलग दुसरी टर्म घेणारे आणि इतरांच्या तुलनेत अनुभवी असलेले आमदार संग्राम जगताप तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असलेले आमदार रोहित पवार यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. अकोले मतदारसंघातून विजयी झालेले आमदार किरण लहामटे हे भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाही. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे जावई आहेत. घुले यांच्याकडून काळे यांना मंत्रीपदासाठी आग्रह होऊ शकतो, मात्र  ते प्रथमच आमदार झाले आहेत. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे पाटील यांच्याकडून त्यांच्या नावाचा आग्रह होण्याची शक्यता असली तरी आमदार तनपुरे हे प्रथमच आमदार झाल्याने ते विधानसभेत नवीन आहेत.दुसरीकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ सर्वसामान्यांच्या बळावर निवडून आलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हेही प्रथमच आमदार झाले असून, ते पक्षातही नवीन आलेले आहेत. त्यामुळे त्यांचेही नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. पवार कुटुंबातील उभारता चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहले जाते. शिवाय त्यांना मंत्री केले तरी कोणाचीही काहीही तक्रार येण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमदार पवार यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते. तर  दुरीकडे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत असणं हे सहाजिकच आहे . आता पक्षश्रेष्टी काय निर्णय घेतात या कडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. पण रोहित दादा असो अथवा संग्राम भैय्या जिल्ह्याला यंदा तरुण मंत्री मिळणार हे मात्र नक्की.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत