रोह्मात राष्ट्रवादी पक्षाला धामणसर्इ ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचा दे धक्का!

धामणसर्इ ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता कोकळे व उपसरपंच गणेश सानप यांच्यावरील अविश्वस ठराव मंजुर

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन धामणसर्इ विभाग ओळखला जातो. या धामणसर्इ विभागातील धामणसर्इ ग्रामपंचायतीचे सरपंच संगिता गंगाराम कोकळे व उपसरपंच गणेश महादेव सानप यांच्यावर शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे यांच्या नेतॄत्वाखाली शिवसेना सदस्य शंकर भगवान काते, राया चाया फसाळ, प्रिया प्रभाकर दळवी, सुहासिनी शांताराम वरणकर, काशी गोविंद शिद यांनी अविश्वास ठराव आणला होता. हा अविश्वास ठराव 2 विरूध्द 5 ने मंजुर झाला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.

 

मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले यश व आज धामणसर्इ ग्रामपंचायतीवरील अविश्वस ठराव त्यामुळे रोहा तालुक्यात तालुका प्रमुख समिर शेडगे व त्यांचे कार्यकर्त्यांच्या नेतॄत्वाखाली शिवसेनेची घौडदोड सुरू झाली आहे. हा ठराव यशस्वी झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. तहसिलदार सुरेश काशिद यांच्या देखरेखीखाली दुपारी 11 ते 11|30 दरम्यान सरपंच संगिता गंगाराम कोकळे यांच्यावर तर 11.30 ते 12 या दरम्यान उपसरपंच गणेश महादेव सानप यांच्यावर अविश्वास ठराव मंजुर करण्यात आला आहे. हा अविश्वास ठराव 2 विरूध्द 5 ने मंजुर झाला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. शिवसेनेने या ग्रामपंचायतीवर कब्जा केले असुन रोह्मात पहील्यांदाच शिवसेनेने तालुका प्रमुख समिर शेडगे यांच्या नेतॄत्वखाली हा अविश्वस ठराव यशस्वी केले आहे.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे, उपतालुका प्रमुख महादेव साळवी, गजानन बैकर, रोहा शहर प्रमुख दिपक तेंडुलकर, विभाग प्रमुख नितीन वारंगे, संतोष खेरटकर, सचिन फुलारे, तालुका कक्ष प्रमुख अनिश शिंदे, तालुका महीला संघटक निता हजारे, नगरसेविका समिक्षा बामणे, उपतालुका कक्ष प्रमुख सुरेश खरीवले, गजानन मालुसरे, उडदवणे सरपंच भारती कोल्हटकर, सदस्य विनायक गायकर, मारूती तुपकर, भगवान कोकरे, सुर्यकांत वाघमारे, मिलनाथ नार्इ क, संदेश साळिंखे यासह शिवसैनिक उपस्थित होते| फोटो सोबत पाठवित आहे|

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत