रोह्मात विविध मागण्यासाठी शेकापचा मोर्चा   

रोहा : महादेव सरसंबे 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार पंडित पाटील यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

रोहा तालुक्यातील नागरिकांना आलेले वाढीव वीज बिले यांच्यासह अवैध्यरित्या केला जाणारा रेतीचा उपसा, अनियमित पाणी पुरवठा, जलप्रदुषण तसेच अतिवॄष्ठीने शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई, मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात यावे  यांसह अन्य मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्याचे निवेदन रोह्याचे तहसीलदार सुरेश काशीद यांना शिष्टमंडळाने दिले.

लाल बावटा हातात घेत भर पावसात  काढण्यात आलेला हा मोर्चा डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागॄह ते रोहा बस स्थानकावरून  तीन बत्ती नाका, फिरोज टॉकीज वरून तहसिल कार्यलयात आला होता .  या मोर्चात शेकाप कार्यकर्त्यांसह महीला वर्गाचा मोठया प्रमाणात सहभाग होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत