रोह्यात कुणबी भवन उद्घाटन सोहळा थाटात; मान्यवरांची उपस्थिती

कोलाड – कल्पेश पवार


कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न ग्रामीण शाखा रोहे तालुका कुणबी समाजाची अस्मिता असणाऱ्या स्व.पां.रा.सानप कुणबी भवनाचा उद्घाटन सोहळा रवि.दि.21 रोजी रा.काॅ.चे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या हस्ते व संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठया थाटात संपन्न झाला.

यानिमित्ताने संपूर्ण कुणबी समाजात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून येत होते. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आ.धैर्यशील पाटील,आ.अनिकेत तटकरे व जि.प.अध्यक्षा आदिती तटकरे,रामचंद्र जाधव,शंकर म्हसकर,शिवराम शिंदे,महेश बामुगडे,उदय कठे ,शिल्पाताई मरवडे,तळा सभापती अक्षता कदम ,रोहे नगर अध्यक्ष संतोष पोटफोडे,आदी प्रमुख मान्यवर सह विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठया संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होतें .

रोहे तालुक्यात कुणबी भवन व्हावे ही समस्त कुणबी बांधवांची इच्छा होती.समाजाचे स्वर्गीय नेते पां.रा.सानप यांनी आपल्या हयातीत समाज संघटीत करून समाजाचे महत्वाचे प्रश्न व समस्या तसेच अनिष्ट रूढी व परंपरा बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान फार मोठे असल्याने त्यांच्या पश्चात रोह्यात उभारण्यात आलेल्या समाज भवनास त्यांचेच नावं देण्यात आले आहे.

यावेळी आ. सुनील तटकरे,आ.धेयशील पाटील ,कुणबी संघाचे अध्यक्ष भूषण बरे,शंकरराव म्हसकर,अँड सुनील सानप ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर तालुका कुणबी अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी प्रास्ताविक केले,रवी दिघे यांनी सूत्रसंचालन केले व सुनील ठाकूर यांनी आभार व्यक्त केले. हा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहे तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधवांनी सहकार्य केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत