रोह्यात भात पिकावर करपा सदृश्य रोगाची लागण!

रोहे : महादेव सरसंबे

या वर्षी रोहा तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे चांगली भातशेती तयार होत आहे.त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.परंतु धाटाव किल्ला परीसरात भात पिकावर करपा सदृश्य रोगाची लक्षणे अढळल्याने शेतकरी धस्तावाला आहे.हाततोंडाशी आलेला घास वाया जाते का अशी भिती निर्माण झाली आहे.या बाब लक्षात येताच धाटाव व किल्ला परीसरातील भातशेतीची पाहणी तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, मंडळ अधिकारी महादेव करे, कृषी पर्यवेक्षक श्रीकांत जाधव, कृषी सहाय्यक प्रियंका सावंत, पुरूषोत्तम देशमुख यांनी बाधीत शेतक-यां समवेत केली आहे. किड रोगाचा प्रादुभाव रोखण्यासाठी कृषी अधिका-यांनी सल्ला देत मार्गदर्शन केले आहे.

रोहा तालुक्यात भातपिकावरील करपा सदृश्य रोग वाढू नये व फैलाव होऊ नये यासाठी तालुक्यातील शेतकरी वर्गाने दक्ष राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रोहा तालुक्यातील सर्व गावात भात पिकावरील किड रोगाचा प्रादुभाव रोखण्यासाठी किडरोग व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहे.हा प्रकल्प राबवित असताना सर्व अधिकारी व कर्मचारी याचे कडून दैनदिंन किड व रोगाची नोंदी, निरीक्षण घेण्यात येत आहे.

यासाठी रोहा तालुक्यातील धाटाव व किल्ला येथे सोमवारी निरीक्षण घेते वेळी करपा सदृश्य रोगाची लागण झालेली दिसुन आली.या वेळी त्वरीत तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी व कृषी विज्ञान केंद्राचे किटक तज्ञ यानी बाधीत क्षेत्राची शेतक-या समवेत पहाणी केली असून शेतक-यानी पुढील उपायोजना करावी असे मार्गदर्शन केले आहे.शेतक-यांनी काँपर आँक्सीकोलारार्इडची 10 लि.पाण्यात 25 गॅ्रमची किंवा स्टेप्टेासायक्लीन ची 10 लि पाण्यात 5 ग्रँम किंवा कॉर्बेनडॅन्झीयमची 10 लि.पाण्यात 10 ग्रँमची फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागा मार्फत करण्यात आले आहे.तसेच प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात किड व रोगाची माहीती पत्रक लावण्यात आले आहे.असे तालुका कृषी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत