रोह्यात ‘भारत बंद’ला चांगला प्रतिसाद, रोहा शहारातील व्यापारी वर्गानी ठेवली दुकाने बंद

रोहे : महादेव सरसंबे

इंधन दरवाडीच्या विरोधात भारत बंदची काँगेस पक्षानी हाक दिली होती.त्यानुसार रोहा काँगेसने रोहा बंदची हाक रवीवारी संध्याकाळी दिल्यानंतर सोमवारी रोहा शहरात बंद पाळण्यात आला.सकाळ पासुनच व्यापारी वर्गानी आपली दुकाने बंद ठेवली होती.गणेशोत्सव असल्याने रोह्यात दुपारी 12 वाजे पर्यंत बंद पाळण्यात आले आहे.या बंद मधुन आत्यआवश्यक सेवा वगळण्यात आली होती.

रोहा काँग्रेसचे विधी सेवा न्याय विभागाचे अ‍ॅड सुनील सानप, रायगड जिल्हा उपाध्यक्ष समिर सकपाळ, शहर अध्यक्ष मितेश कल्याणी, युवा अध्यक्ष विनोद सावंत, रायगड जिल्हा पर्यावरण सेलचे सचिन मोरे, माजी नगरसेवक रमेश साळवी, शब्बीर नाडकर, अल्ताफ चोरडेकर, जयंत पांचाळ, हेमंत साळवी, सागर कोठारी, अमित चव्हाण यांच्यासह काँगेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रोहा शासकीय विश्रामगृहात रवीवारी झाली.या वेळी रोहा बंद या साठी चर्चा करण्यात आली.गणपती उत्सव असल्याने रोहा शहर दुापरी 12 पर्यंत बंद करण्याचे ठरविण्यात आले.त्यानुसार सोमवारी सकाळी पासुनच रोहा शहारात बंद पाळण्यात आले.दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सकाळच्या सत्रात रोहा शहरात सामसुम दिसून आले.या बंद मधुन आत्यवशयक सेवा असलेले दवाखाने, मेडीकल, दुध, पेपर, हे वगळण्यात आले होते.

कोकणचा लाडका उत्सव गणेशोत्सव जवळ असल्याने नागरीकांची खरेदीसाठी लगबग चालु आहे.हे लक्षात घेत रोहा काँगेसने दुपारी 12 पर्यंत बंद पाळण्याचे ठरविले त्यानुसार आज रोहा दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्यात आले.दुपारी 12 नंतर रोह्यातील व्यापारी वर्गानी आपली दुकाने चालु केली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत