रोह्यात रूखी समाजाचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण!

मागण्यापुर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही : विलास सोलंकी

रोहे : महादेव सरसंबे

रोहा नगरपालिका हद्दीतील रूखी समाजाचे समाज मंदिर, अनुकंपा भरती, कंत्राटी कामगरांना कायम करणे यासह विविध मागण्या आहेत.या मागण्यासाठी चरोतर रूखी समाज रोहा पंचायत यांनी जिल्हा परीषद व नगरपालिका प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठ पुरावा केला असता ही त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने बुधवारी सकाळी रोहा नगरपरीषदेसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

 

समाजाचे नेते विलास महादेव सोलंकी, दिलीप रणछोड सोलंकी, दिनेश चिमण सोलंकी व चंद्रकांत चिमण सोलंकी हे आमरण उपोषणास बसले असुन त्यांना समाजाने पुर्ण पाठींबा देत बुधवारी समाज बांधव महीला वर्ग रोहा नगरपालिकेसमोर उपोषणास बसले आहेत.
या उपोषणास शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे यांनी पाठींबा दिला असुन संपुर्ण रोहा शहारातील शौचालय स्वच्छ ठेवणारे या कामगारांच्या जवळच शौचालय नसल्याची खंत व्यक्त करीत त्यांच्या न्यायी हक्कासाठी संपुर्ण शिवसेना रूखी समाजाच्या पाठीशी उभा राहाणार असल्याचे सांगितले.या वेळी त्यांच्या समवेत रोहा शहर प्रमुख दिपक तेंडुलकर, नगरसेविक समिक्षा बामणे, शिवसेना अल्पसंख्याक सेल अध्यक्ष उस्मान रोहेकर, शाखा प्रमुख योगेश डाखवे आदी होते.

समाजावर प्रशासनावर आन्याय होत असुन त्यांनी विविध मागण्यासाठी जिल्हा परीषद व रोहा नगरपालिका यांच्याकडे 1997 सालापासुन पाठपुरावा केला आहे. तत्कलीन मंत्री व विद्यमान आ.सुनील तटकरे यांच्याकडे ही पत्रव्यवहार केल्याचे विलास सोलंकी यांनी सांगितले.परंतु कोणत्याही मागण्या पुर्ण न झाल्याने आज आमरण उपोषणाचे हत्यार उपासल्याचे सांगितले.

समाजाच्या विविध मागण्या असुन यामध्ये समाजाला समाज मंदीर रोहा शहरात बांधणे, कै.मगन रणछोड सोलंकी यांचा मृत्यु नंतर 2006 पासुन अनुकंपात घरातील व्यक्तीला रोहे अष्टमी नगरपरीषदेत कामावर हजर करून घेतलेले नाहीत, राजेश रतिलाल सोलंकी रोहा अष्टमी नगरपरीषदेचे कंत्राट बेसिकवर वैकुंठ धाम येथे मशीन ऑपरेटर व सफार्इ कामगार म्हणुन गेली 14 वर्ष काम करीत असून त्यांना कायम स्वरूपी नगरपरीषद मध्ये घेतले जात नाही, महात्मा फुले नगर धावीर रोड येथे रोहे अष्टमी नगरपरीषद वसाहतीत एकुण 8 रूम सन 1971 साली उभारण्यात आले आहेत.परंतु आजपर्यंत रंगरंगोटी की दुरूस्तीचे काम करण्यात आलेले नाही., चरोतर रूखी समाजातील 4 व्यक्तींचे घरे सन 2006 रोजी तहसिल इमारत बांदल्यामुळे विस्थापीत ( बेघर) झाले आहेत.ते सुध्दा घरांपासुन वचिंत आहेत., महात्मा फुले नगर, धाविर रोड येथे अष्टमी नगर परीषद शौचालय सफार्इ कामगार 5 व इतर 3 वसाहत मध्ये 8रूम सन 1971 साली उभारण्यात आले आहेत.शासनानी जाहीर केलेल्या परीपत्रकानुसार आम्ही वसाहतमध्ये रहात असलेली घरे नावे मिळण्यासाठी वारंवार निवेदन देऊन सुध्दा आज पर्यंत कोणतीही कार्यवाह झालेली नाही.

रोहे अष्टमी नगर परीषद हददीतील लोकसंख्या 1.5 लाख अंदाजे आहेत. आणि रोहे अष्टमी नगरपरीषदेच शौचालय सफार्इ कामगार पुरूष 3 व स्त्रि 1 असे एकुण 4 व्यक्ती काम करीत आहेत.तरी शौचालय सफार्इ कामगार वाढविण्यात यावे आशा विविध मागण्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत