रोह्यात सॅम्पट्रान्स कंपनीत आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

रोहा : रायगड माझा ऑनलाईन 

roha-fire

रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीत सॅम्पट्रान्स कंपनीत आज सकाळी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या आगीत जखमी वा जीवितहानी झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या प्रयत्नांना यश आले आहे. प्राथमिक तपासानुसार रबराला आग लागल्याचे स्पष्ट झाले असले तरी कारण अद्याप कळलेले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत