लग्नाचे अमीष दाखवून अल्पवयीन युवतीवर बलात्कार

शिक्रापूर :रायगड माझा

जातेगाव खुर्द (ता.शिरुर) येथील एका युवकाने एका अल्पवयीन युवतीस लग्नाचे अमीष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून लग्न केले. तसेच पीडितेच्या भावाला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार एका युवकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी, जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील पीडित युवतीला सागर किसन शेलार (वय 24 वर्षे, रा. जातेगाव खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे) याने लग्नाचे अमीष दाखवत तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सागर याने पीडित युवतीस “तु माझ्याशी लग्न कर. लग्न केले नाही तर, मी तुझे वाटोळे करीन आणि तुझ्या भावाला मारीन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर सागर याने या युवतीस पळवून नेऊन अहमदनगर येथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन युवतीस आळंदी येथे घेऊन जाऊन तिच्याशी वैदिक पद्धतीने लग्न केले.
याबाबत पीडित युवतीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी सागर किसन शेलार याच्यावर अपहरण, बलात्कार, दमदाटीप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यास रविवारी (दि.17) पुणे न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक गणेश वारुळे आणि पोलीस हवलदार पुनाजी जाधव हे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत