लग्नाचे आमिष दाखवित बलात्कार प्रकरणी दंडासह 7 वर्षाची सक्तमजूरी; माणगांव सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

माणगांव सत्र न्यायालयाने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवित पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी किशोर वामन म्हात्रे यास 50 हजार रुपये दंड व 7 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा दिली आहे. तर साथीदार दिपक प्रभाकर सोनावणे आणि ज्ञानेश्वर जनार्दन म्हात्रे यांस दोषी ठरवित प्रत्येकी 7 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना रोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे तांबडी कवाळटे आणि भिसेखिंड, जि. रायगड गावचे हद्दीत 24 मार्च 2016 रोजी घडली होती. माणगांव सत्र न्यायालयाचा हा मह्त्वपूर्ण निकाल मानला जात आहे.

सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की, यातील आरोपी किशोर वामन म्हात्रे याने फिर्यादी हिचेबरोबर प्रेमाचे नाटक करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिला भेटण्याकरीता भाटे वाचनालय येथे बोलावून घेऊन त्याठिकाणी आरोपी किशोर म्हात्रे, दिपक सोनवणे व ज्ञानेश्वर म्हात्रे याने फिर्यादीचा हात धरून स्कॉर्पिओ गाडीत जबरदस्तने बसवून पळवून नेले. साथीदार दिपक सोनवणे व ज्ञानेश्वर म्हात्रे पुढे जाऊन गाडीतून उतरले व किशोर म्हात्रे याने गाडीतील मधल्या सीटवर जबरी संभोग केला. फिर्यादीने तू लग्न का करीत नाहीस असा जाब विचारला असता आरोपीने दमदाटी करून हाताबुक्क्याने मारहाण केली. सदर घटनेची फिर्याद रोहा पोलिसांनी घेऊन भादविस कलम 376, 366, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर खटल्याची सुनावणी माणगांव सत्र न्यायालयात झाली. सत्र न्यायाधिश मा. टी. एम. जहागिरदार यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबितीनंतर आरोपी दिपक सोनावणे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांस दोषी ठरवून 11 जुलै 2018 रोजी शिक्षा दिली. आरोपी किशोर वामन म्हात्रे यास पिडीत मुलीवर बलात्कार केल्याचे सिध्द झाल्याने भादवि कलम 376 नुसार 7 वर्ष सक्तमजूरी व 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्ष सक्तमजूरी, भादवि कलम 417 अन्वये 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद तसेच आरोपी किशोर म्हात्रे दिपक सोनावणे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पिडीत मुलीचे अपहरण केल्याचे सिध्द झाल्याने भादवि कलम 363 अन्वये प्रत्येकी 7 वर्ष सक्तमजूरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी 1 वर्ष सक्तमजूरी व भादवी कलम 506 प्रमाणे 2 वर्ष सक्तमजूरीची शिका ठोठावली आहे.

या गुन्ह्याचा तपास बी.के.साळवे पोलिस उपनिरिक्षक रोहा यांनी केला. सदर खटल्यामध्ये सहा. जिल्हा सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने प्रभावी युक्तीवाद केला. सदर केसचे काम करीत असतांना पैरवी अधिकारी पी.के.जाधव, शशिकांत कासार, पो.हे.कॉ. पवार यांनी मदत केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत