लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; वेळोवेळी प्रस्थापित केले शारीरिक संबंध

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त

लग्नाचे आमिष दाखवून उदय राजपूत (वय २५, रा.वैजापूर, जि.औरंगाबाद) याने सिडकोतील २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

आरोपी राजपूत याने पीडितेस वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान पीडितेस गर्भधारणा झाली असता, आरोपी राजपूत याने पीडितेस गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला होता. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता राजपूतने तिला जातिवाचक शिवीगाळ करून समाजात बदनामीची धमकी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत