लग्नाच्या पंगतीत ताटांवरून राडा, एकाचा मृत्यू

रायगड माझा ऑनलाईन |बलिया 
Image result for लग्नाच्या पंगतीत ताटांवरून राडा, एकाचा मृत्यू

लग्नातलं जेवण म्हटलं की अनेकजण त्यावर तुटुनच पडतात. मात्र याच जेवणावरून एका तरुणाचा हकनाक बळी गेल्याची दुर्देवी घटना उत्तरप्रदेशमधील बालिया जिल्ह्यात घडली आहे. लग्नातील जेवणाची ताटं संपल्यानंतर कॅटरर्स व पाहुण्यांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत.

बालिया जिल्ह्यातील बसईपुरा भागातील एका हॉलमध्ये लग्नसंमारंभ सुरू होता. लग्नात पाहुण्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र लग्नात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमल्याने कॅटरर्सला ताटांचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे त्याने नवीन आलेल्या पाहुण्यांना थांबण्यास सांगितले. यावरून एका पाहुण्यात व कॅटरर्समध्ये वादावादी झाली. त्या वादावादीनंतर झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. त्या सहा जणांना रुग्णालयात नेत असताना रवी दुबे या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत