लग्नाच्या पार्टीत पतीला दारू पाजून नवविवाहितेवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : रायगड माझा 

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील शिक्रापूरजवळील हॉटेल कैलास येथे नवदांपत्याला पार्टी देण्याचा बहाणा करून तरुणास दारू पाजली. त्यानंतर दुसऱ्या खोलीत त्याच्या पत्नीवर एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता नवविवाहित मुलगी ही 15 वर्षांची आहे. दोघांनी तिला व तिच्या पतीस लग्नाची पार्टी देतो, असे सांगून हॉटेल कैलास येथे 29 जुलै रोजी दुपारी नेले होते. त्या ठिकाणी एका खोलीत पीडितेच्या पतीस आरोपींनी दारू पाजली. त्याच वेळी मुलीला दुसर्‍या खोलीत नेत दुसऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर दोघेही फरार झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत