लग्नाच्या संगीतमध्ये डान्स करतानाच युवकाचा मृत्यू !

रायगड माझा ऑनलाईन | जयपूर

Image may contain: 1 personमृत्यू कधी, कुठे कोणाला गाठेल, सांगता येत नाही. राजस्थानमध्ये लग्नाच्या संगीतमध्ये डान्स करतानाच युवकाचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ‘तेरी बाहों मे मर जाये हम’ या ओळीवर नाचतानाच युवकाने अखेरचा श्वास घेतला.

युवकाच्या अखेरच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून अनेक जण हळहळत आहे. राजस्थानात एका लग्नाच्या संगीतमध्ये एक जोडपं डान्स करत होतं. गाणं होतं ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘तुझे देखा तो ये जाना सनम…’

गाण्याला सुरुवात झाली. दोघांनी गिरक्या घेत डान्स केला. मात्र अचानक युवकाची शुद्ध हरपली आणि तो खाली पडला. त्याच्यासोबत नाचणाऱ्या तरुणीला पटकन याची जाणीव झाली नाही आणि तिने तीन-चार सेंकंदांचा उरलेला परफॉर्मन्स पूर्ण केला.

त्यानंतर ही काहीतरी गंभीर गोष्ट आहे, याची जाणीव तरुणीला आणि संगीतमधील उपस्थितांच्या लक्षात आली. सर्वजण तिकडे धावले, मात्र तोपर्यंत युवक गतप्राण झाला होता, अशी माहिती आहे.

राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील ही घटना असल्याची प्राथमिक माहिती आहे. विजय ढेलडिया असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे, तर त्याच्यासोबत परफॉर्म करणारी तरुणी ही त्याची पत्नी असल्याचं म्हटलं जातं. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत