लग्नानंतर देवदर्शनाला गेलेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू

औरंगाबाद : रायगड माझा

औरंगाबाद-बीड मार्गावर दुधाचा टँकर आणि बोलेरो जीपमध्ये झालेल्या अपघातात एका नवरदेवासह एकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास घडली. लग्नानंतर देवदर्शनासाठी गेल्यानंतर नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात सुमारे सहा जण यात जखमी झाले आहेत.

औरंगाबादेतील गोडसे कुटुंबीय मुलाच्या लग्नानंतर देवदर्शनासाठी तुळजापूर येथे गेले होते. देवदर्शन आटोपून ते औरंगाबादकडे निघाले होते. नवरदेव स्वत: बोलेरो गाडी चालवत होता. पहाटे गाडी अंबडजवळच्या खेड गावाजवळ आली असता समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरला बोलेरोची जोरात धडक बसली. यात नवरदेव आणि आणखी एकाचा मृत्यू झाला. तर सुमारे सहा जण जखमी झाले. जखमींवर औरंगाबादमधील घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत