लग्नासाठीची नवी अट; भावी पत्नीला सोशल मीडियाची चटक नको

 

(रायगड माझा ऑनलाईन टीम )

पश्‍चिम बंगालमध्ये सरकारी नोकरीत असलेल्या एका युवकाची लग्नाची तयारी सुरू आहे. आपल्या होणार्‍या पत्नीपासून त्याला काही अपेक्षा आहेत. त्याप्रमाणे मुलीचे वय 18 ते 22 च्या दरम्यान असावे तसेच शिक्षण 12 वी पर्यंत झालेले असावे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे मुलीला सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, वॉट्सअप याची चटक नसावी. राज्यात लग्नासाठीच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये ही अट दिसून येत असून दिवसेंदिवस हा ट्रेंड वाढतच चालला आहे. यामुळे सामाजिक तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 

सोशल मीडियाच्या सवयीसंदर्भात भारत गेल्या वर्षी जुलैपर्यंत जगात सर्वात अव्वल राहिला आहे. देशात 24.1 कोटी लोक फेसबुकचा तर 20 कोटी लोक वॉट्सअ‍ॅपचा वापर करतात.

सोशल मीडियाचे अनेक वाईट परिणामही आहेत. सोशल मीडियावर अनेकदा खोटी माहिती येते, यातून मोठ्या प्रमाणात दगाफटका संभवतो. याशिवाय सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तणाव, निद्रानाश, बेचैनी यात वाढ होते, असे माजी पोलीस अधिकारी पल्लव कांती घोष यांनी यासंदर्भात दुसर्‍या पैलूवर चर्चा करताना सांगितले.

लग्नाच्या जाहिरातीमध्ये लोक जर अशा प्रकारच्या अटी घालत असतील तर यामागे काही कारणे आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला जोडीदार दुसर्‍याच्या संपर्कात यावा असे लोकांना वाटत नाही. याचा वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम होवू शकतो. बरेच लोक जगासमोर आपल्या खासगी आयुष्याचा खुलासा करायला तयार नसतात, असे सांगून समाजशास्त्रतज्ज्ञ प्रशांता रे यांनी समाजातील या वाढत्या ट्रेंडबाबत चिंता व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत