लता दीदींचा पहिला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल !

मुंबई : रायगड माझा वृत्त 

काही दिवसापूर्वींच जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर गानसम्राज्ञी लता दीदी यांनी देखील एक सेल्फी ट्विटवर शेअर केला आहे. त्यांचा सेल्फी पाहताच तुम्हाला वाटेल हा फोटो २-३ वर्षामागील असेल मात्र, त्यांचा हा फोटो ५० वर्षापूर्वीचा आहे. त्यांनी स्वतःच या फोटोचा खुलासा केला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या लता मंगेशकर यांनी सोमवारी एक फोटो पोस्ट केला. त्यांचा हा फोटो पाहताच ५० वर्षापेक्षा अधिक काळाचा असल्याचे वाटते. त्यांनी हा फोटो पोस्ट करतेवेळेस म्हटंले आहे की, नमस्कार, १९५० मध्ये मी स्वतःहुन काढलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला आत्ताच्या जगात सेल्फी, असे म्हणतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत