लवकरच वीस रुपयांचे नाणे चलनात येणार

कानपूर ; रायगड माझा ऑनलाईन 

दहा रुपयांप्रमाणेच आता बाजारात वीस रुपयांचे नाणे येणार आहे. तसेच हिंदुस्थान सरकार लवकरच एक रुपयांपासून दहा रुपयांपर्यतच्या सर्व नाण्यांच्या आकारात बदल करणार आहे. या नाण्यांचे नवीन डिझाईन तयार करण्यात येत आहे. डिझाईन फायनल झाल्यानंतर दिल्लीत एका बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

या बैठकीत नवीन डिझाईन असेलल्या नाण्यांबरोबरच वीस रुपयाच्या नवीन नाण्याचाही आकार कसा असावा हे ठरवण्यात येणार आहे. वीस रुपयाचे नाणे अष्टकोणी आकाराचे असण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे ही नवीन नाणी दृष्टीहीनांनाही सहज हाताळता येतील याची काळजी घेण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत