लाचखोर लेखापाल आणि वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

यवतमाळ: कल्पक वाईकर

वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून 5 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लाच लुच्पक विभागाने अटक केली आहे. यामध्ये उमरखेड़ वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल आणि वनरक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकड़ले आहे.

उमरखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल अरविंद रामराव आगलावे आणि वनरक्षक संजय सुदामराव ठाकरे यांनी तक्रारदारचे प्रलंबित असलेले वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार एसीबीला केली होती. त्यांच्या या तक्रारीवरून काल बुधवारी 3000 हजार रुपये पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.दरम्यान लाच लुचपत विभागाच्या या कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांचे ढाबे दणानले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत