लालबागचा राजा महलातून अवतरला जंगलात!

अनेक गणेश भक्तांचा लाडका बाप्पा म्हणजे लालबागचा राजा. मंगळवारी लालबागच्या राजाचे पहिलं दर्शन आणि फोटोसेशन करण्यात आलं.यंदा लालबागच्या राजाच्या दरबारात हायटेक ऑगमेंटेड तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निसर्ग देखावा साकारण्यात आला आहे.

या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने निसर्ग जिवंत स्वरुपात भाविकांना पाहाता येणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी ही करामत करुन दाखवली आहे.लालबागचा राजा यावेळी राजमहालात नसून जंगलात विराजमान आहे.राजा जंगलात असल्यामुळे तो सिंहासनावर नाही तर शिळेवर बसला आहे.तब्बल 30 वर्षांनी लालबागच्या राजाच्या देखाव्यात हा प्रयोग करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत