लालबागच्या ‘राजा’च्या चरणी सोन्याची वीट

रायगड माझा वृत्त 

परळमधील लालबागच्या राजा चरणी यंदाही भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. भक्तांनी लालबागच्या राजा चरणी सोन्याची वीट, सोन्याची मूर्ती आणि घड्याळ अर्पण केली आहे. यंदा राजाच्या चरणी ५.५ किलो सोन आणि ७५ किलो चांदी अर्पण करण्यात आली असून आज या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.’लालबागचा राजा’ला अर्पण केलेली त्याची सोन्याची प्रतिकृती ही १ किलो २७१ ग्रॅमची आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. हा हिरा अंदाजे १ लाख रुपयांचा असल्याचं सांगण्यात येतंय. या मूर्तीसोबत मोदक आणि सोन्याचं फूलही अर्पण करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाला भक्तांनी दिलेल्या या अनमोल वस्तूंचा आज सायंकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत लिलाव करण्यात येणार आहे. लालबागचा राजाच्या मंडपातच हा लिलाव होणार असून लिलावातून येणारा सर्व पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. १९८५ पासून हा लिलाव करण्यात येतो. लिलावातून येणाऱ्या पैशातून गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यात येतो, असं लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांनी सांगितलं.

गेल्या वर्षीही धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. गेल्यावर्षी एका व्यक्तिने या लिलावाच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यंदा कुणाचाच अर्ज आला नसल्याचं धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितलं. कमीत कमी दहा गरीब मुलांना दत्तक घेण्याच्या सूचना सर्व मंडळांना करण्यात आल्या आहेत. या मुलांच्या पालनपोषणापासून ते त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च या मंडळांना करायचा आहे, असं डिगे यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत