लालबाग-परळमध्ये 135 गणेशभक्तांचे मोबाईल लंपास!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र ‘लालबागचा राजा’ परिसरात संधीसाधू चोरट्यांनी भक्तांचे खिसे कापणंही सोडलं नाही. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल 135 मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.

मुंबईतील लालबाग परिसरात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागते. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हेतू साध्य करताना दिसत आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्यात चार दिवसात तब्बल 135 मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.

गणेशोत्सव काळात मुंबईतील विविध भागातून गणपती पाहण्यासाठी लालबाग, परळ परिसरात हजारो भक्त गर्दी करत असतात. सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले असले तरीही भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तू चोरत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांचा आढावा घेता सुरत गॅंग आणि यूपी गॅंग या टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत