शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

Follow Us

Follow Us

‘लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान आमचाच होणार’ – अशोक चव्हाण

पंतप्रधान नरेंद मोदींच आजच भाषण हे प्रचाराच भाषण होत. मात्र, मोदींचे हे भाषण लाल किल्ल्यावरील शेवटचं भाषण आहे, यापुढचा पंतप्रधान हा आमचाच असेल,

रायगड माझा ऑनलाईन | मुंबई 

'This last speech of Modi, india's next PM will be ours', says Ashok chavan | 'लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान आमचाच होणार' 
‘लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान आमचाच होणार’ 

पंतप्रधान नरेंद मोदींच आजच भाषण हे प्रचाराच भाषण होत. मात्र, मोदींचे हे भाषण लाल किल्ल्यावरील शेवटचं भाषण आहे, यापुढचा पंतप्रधान हा आमचाच असेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथे संपन्न झालेल्या ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती राज्यभर जनसंघर्ष यात्रा काढणार आहे. 31 ऑगस्टपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आज मुंबईत चव्हाण यांनी मोदींवर तोफ डागली. मोदी केवळ खोट बोलतात, त्यांनी खरे बोलावं. देशात 15 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जीवन संपवले. तसेच मीरा भाईंदर येथे बॉम्ब सापडले आहेत. त्यामध्ये सनातन संस्थेचे नाव पुढे आले आहे. मात्र, त्यावर कुठलिही कारवाई करण्यात येत नाही. सनातन संस्थेवर बंदी का घातली जात नाही, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तर मोदींचे हे भाषण शेवटचे भाषण आहे, पुढचा पंतप्रधान हा आमचाच असेल, जनता नक्कीच आम्हाला कौल देईल, असेही अशोक चव्हाण यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बोलताना म्हटले.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत