लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

वसई : रायगड माझा ऑनलाईन 

वसई पूर्व सातीवलीत एका सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये ७ वर्षीय चिमुकल्याचा अडकून मृत्यू झाल्याची हृदय हेलवणारी घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली.

हंस कुमार गौड ( वय ७, रा.१०४ ,डायस रेसिडेन्सी, सातिवली) असे मृत मुलाचे नाव आहे. सातिवलीच्या “डायस रेसिडेन्सी” या सात मजली इमारतीत लिफ्टने हंसकुमार हा आपल्या मित्रांसमवेत पहिल्या माळ्यावर लिफ्टने आला होता. तो लिफ्टमधून बाहेर पडताना भिंत व लिफ्टच्या गेटमध्ये हंसचा पाय अडकून पडला. त्याचवेळी लिफ्ट चालू झाली आणि यामध्ये अडकून पडलेल्या हंसच्या शरीरासोबत खाली जाऊ लागली. तोपर्यंत हंस पूर्ण अडकला गेला त्यावेळी त्याने हंबरडा फोडला होता.

दरम्यान हंसच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी व इमारतीतील लोक जमले त्यांनी हंस सहित लिफ्टचे लॉक तोडून लिफ्ट पहिल्या मजल्यावरून हळूहळू खाली आणली, या घटनेत हंसचे शरीर भिंत व लिफ्टमध्ये अडकले आणि यामध्येच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वालिव पोलिस व अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल तर झाले मात्र त्याआधीच हंसचा मृत्यू  झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणी वालिव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला असल्याची माहिती वालिव पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत