लिव्ह इन रिलेशनमधून महिलेचा खून

विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह टाकला सोसायटीमधील पाण्याच्या टाकीत

बीएएमएसच्या विद्यार्थ्यास अटक
रायगड माझा वृत्त

पुणे – लिव्ह इन रिलेशनमधून एका नेपाळी महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राहत्या सोसायटीतील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका बीएएमएसच्या विद्यार्थ्यास अटक केली आहे.

सुन्मया गणेश तमांग (35, रा. शिवनेरी अपार्टमेंट, आंबेगाव पठार) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, अरुण पवार (28) याला अटक करण्यात आली आहे.

संबंधीत महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळ्याची घटना शनिवारी उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा शोध घेतला असता ती याच सोसायटीत राहणारी असल्याचे आढळले. ती येथे बहिण व मेव्हण्यासोबत नेपाळवरून आली होती. इथे आल्यावर तीचे अरुण बरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर ती लिव्ह इन रिलेशमध्ये त्याच्यासोबत राहात होती. काही कारणावरून तिचा अरुणबरोबर वाद झाला होता. यानंतर अरुणने तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक साळुंके तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत