लिहून घ्या, अामचीच सत्ता येणार; काेणत्याही परिस्थितीत सेना भाजप युती नाही: उद्धव ठाकरे

नागपूर : रायगड माझा

‘भाजपाध्यक्ष अमित शहा कितीही म्हणत असले तरी यापुढे अाम्ही भाजपशी युती करणार नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तसा निर्णय यापूर्वीच झालेला अाहे,’ असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बाेलताना दिले. ‘शिवसेना कधीही कोणताही सर्व्हे करीत नाही. अामचा विश्वास सर्व्हेवर नाही तर कृतीवर आहे. मात्र २०१९ मध्ये राज्यात आमची सत्ता येईल, हे लिहून घ्या,’ असा दावाही त्यांनी केला.

अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी व पक्षाच्या तयारीचा अाढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात अाले हाेते. रविभवन येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘भंडारा-गाेंदिया लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार का?’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘पालघरच्या निवडणुकीत अाम्हाला काेणाचा पाठिंबा मिळताे त्यावर भंंडाऱ्याचा निर्णय घेतला जाईल. माझा महाराष्ट्र दौरा हा भाजप किंवा इतर काेणावरही दबाव टाकण्यासाठी नाही तर पक्षसंघटन वाढवण्यासाठी अाहे,’ असे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिले. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमबद्दल अविश्वास गोंधळाचे वातावरण आहे. याबद्दल सर्व पक्षांनी मिळून काय तो निर्णय घ्यायला हवा. लोकशाहीत आपले मत कोणाला गेले हे जाणून घेण्याचा मतदाराचा अधिकार आहे. तो हिरावून घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.

नाव वगळल्यामुळे शिवसैनिकांचा गाेंधळ
विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत उद्धव यांच्यासह दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, विदर्भातील संपर्कप्रमुख उपस्थित होते. नागपुरातील कार्यकर्त्यांशी प्रथमच उद्धव यांनी संवाद साधला. या वेळी काही कार्यकर्त्यांची नावे बैठकीतून वगळल्याने त्यांनी रविभवनाबाहेर गोंधळ घातला. आपण शिवसेनेसाठी स्वतःवर केसेस ओढवून घेतल्या. असे असतानाही नाव बैठकीतून वगळण्यात आले, असे एका कार्यकर्त्याचे म्हणणे होते. त्यानंतर त्यांची समजूत काढली.

महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचा विकास
शिवसेना विदर्भविराेधी असल्याचा अपप्रचार करण्यात येतो. पण ते खरे नाही. ‘विदर्भ माझा आणि मी विदर्भाचा आहे. महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचा विकास होऊ शकतो आणि सध्या होतही आहे. सगळी महत्त्वाची खाती विदर्भात आहेत. नाणारसारखे प्रकल्प विदर्भात आले पाहिजेत. त्यातून विदर्भाचा विकास होईल’, असा टाेलाही ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लगावला.

लाेकसभा मतदारसंघांत उमेदवारांचा शाेध
ठाकरे यांनी विदर्भातील अामदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दिवसभर बैठक घेऊन आगामी निवडणुकांबाबत त्यांची मते जाणून घेतली. स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत सज्ज राहण्याचे अावाहनही पदाधिकाऱ्यांना केले. २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली हाेती. मात्र विदर्भात शिवसेनेला अवघ्या ४ जागा मिळाल्या, तर भाजपचे ४४ अामदार निवडून अाले. युतीत असताना शिवसेनेचे विदर्भात ९-१० आमदार निवडून यायचे. अमरावती, रामटेक, वाशीम-यवतमाळ व बुलडाणा या ४ मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. अागामी लाेकसभा निवडणूक स्वबळावर लढल्यास शिवसेनेला विदर्भातील इतर ६ लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. त्या दृष्टीने नागपूर, भंडारा-गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि अकोला या मतदारसंघांत शिवसेनेकडून तगड्या उमेदवारांचा शाेध सुरू अाहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत