मुंबई : रायगड माझा वृत्त
मुंबईच्या प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करताना नेहमीच कोणत्याना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत. कधी गर्दीचा त्रास तर कधी ट्रेल लेट होण्याचा त्रास तर कधी जागेवरून होणारा वाद. या सर्व त्रासातून सुटल्यानंतर आता एका वेगळ्याच संकटाचा सामना प्रवाशांना करावा लागतोय. तो म्हणजे लुडोचा.
कर्जत ते मुंबई असो किंवा कसारा ते मुंबई या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास करताना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागतं. आता एका नवीनच त्रासाला या प्रवाशांना सामोरे जावं लागतंय. ते म्हणजे मोबाईल गेमच्या. मोबाईलमध्ये असलेल्या ल्युडो गेमचा वापर लोकलमध्ये प्रवासी सऱ्हास करताना दिसत आहेत.
हे प्रवासी ग्रुप करून हा ल्युडो गेम खेळत असल्याने इतर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. हा गेम ग्रुप करून खेळत असल्याने दोन्ही सीटच्या मध्ये असणाऱ्या जागेवर प्रवाशांना उभे देखील राहता येत नाही. रोज प्रवास करणारे प्रवासी असल्याने इतर प्रवाश्यांवर हे दादागिरी करून गेम खेळत असतात.
हा लुडो गेमचा प्रकार सध्या लांब पल्याच्या लोकलमध्ये जास्त प्रमाणात पहायला मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने यांच्यावर आवर घाला असा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
शेयर करा